logo

दुभाजकांमधील कचरा जाळल्यामुळे त्यापासून तयार झालेल्या विषारी धुरामुळे नागरिक त्रस्त

दुभाजकांमधील कचरा जाळल्यामुळे त्यापासून तयार झालेल्या विषारी धुरामुळे नागरिक त्रस्त

महेंद्र महाजन रिसोड

रिसोड :- रिसोड शहरांमधील रस्त्यामधील दुभाजक बनले कचराकुंडी या हेडलाईन खाली बातमी प्रसिद्ध होताच रिसोड शहरातील दुभाजकामधील कचरा हा नगर परिषदेच्या वतीने उचलून देण्यात यावा ही अपेक्षा होती परंतु या दुभाजकामधील कचरा उचलून न नेता त्या ठिकाणी जाळून टाकण्यात आला त्यामुळे जाळलेल्या कचऱ्याचा विषारी धुरामुळे नागरिकांना चालताना त्रास होत असल्याचे चित्र दिसून आले विशेषता नगर परिषदेच्या वतीने हा कचरा उचलून नेणे द्यावा हीच अपेक्षा सर्व जनतेची होती व त्यामध्ये माती टाकून सुशोभीकरण करावे असे नागरिकांची इच्छा होती परंतु यामधील कचरा उचलून न नेता त्या ठिकाणी जाऊन टाकल्यामुळे त्यामधून निघणाऱ्या विषारी ध्रुवयामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे स्वच्छ रिसोड हे फक्त नावालाच का असे चित्र रिसोड शहरात दिसून येत आहे संबंधित वृत्तपत्राने बातमी प्रकाशित केल्यानंतर सदर नगरपरिषद कचरा उचलून नेते किंवा त्या ठिकाणी जाऊन टाकले जाते यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे हा त्रास कमी होण्यापेक्षा जास्तीचा वाट आहे नगरपरिषदेने स्वच्छतेच्या बाबतीत जसे नंबर वन आहे त्याचप्रमाणे रिसोड शहर स्वच्छ असणे ही नागरिकांची इच्छा आहे कचरा उचलण्यासाठी लावण्यात आलेल्या ह्या वेळेवर फिरणे आवश्यक आहे तसेच रिसोड शहरांमधील कचरा हा रोजच्या रोज उचलल्याने हेही तेवढेच महत्त्वाचे आहे जे नागरिक दुभाजकांमध्ये कचरा टाकत असतील त्यावर नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कारवाई करणे हेही महत्त्वाचे विषय आहे सध्या प्रशासक असल्यामुळे मुख्याधिकारी यांचे लक्ष देण्याची गरज आहे

0
0 views